रंगभूमीपासून ते रेकॉर्डिंग स्टुडिओ, पैठणी होम मिनिस्टर आणि गणेशोत्सव देखाव्यांपर्यंतचा सविस्तर प्रवास व सादरीकरण.
रेडिओ जाहिराती, जिंगल्स आणि ऑडिओ-व्हिज्युअल जाहिरातींसाठी लेखन, दिग्दर्शन आणि व्हॉईस-ओव्हर, तसेच प्रदर्शन आणि स्टेज शोसाठी थेट सूत्रसंचालन.
महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांसाठी १००० हून अधिक निवडणूक प्रचार रेकॉर्डिंग — पारंपरिक ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स आणि डॉक्युमेंट्री.
५०० हून अधिक गणेश उत्सव रेकॉर्डिंग आणि महाराष्ट्रातील मंडळांसाठी सजीव देखाव्यांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती.
२५ वर्षांपासून राज्यभरातील मंचांवर कवितावाचन, कथाकथन, विनोद, रहस्य आणि भावूक एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण.
तृतीयपंथी समुदायासाठी "पैठणी होम मिनिस्टर" शो आयोजित करणारे महाराष्ट्राचे पहिले निवेदक — २०० हून अधिक प्रयोग.
झी मराठीच्या "हास्यसम्राट" पासून प्रवीण तरडे आणि सतीश तारे यांच्या मार्गदर्शनाखालील नाटकांपर्यंतचा प्रवास.
— राहुल विनायक भालेराव